सत्कार स्वीकारल्यानंतर भाजप खासदार रवी किशन खुर्चीवरुन पडले

ravi-kishan

नवी दिल्ली – उत्तरप्रदेशमधील गोरखपूरचे भाजप खासदार रवी किशन यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्या दिसेल की, जेव्हा रवी किशन हे व्यासपीठावरील एका खुर्चीवर बसत होते तेव्हाच ते खुर्चीवरुन अचानक खाली पडले. त्यांचा हा व्हिडिओ केवळ काही सेकंदांसाठी आहे.

http://https://twitter.com/i/status/1330347670188208128

ravikishanछठ पुजेच्या निमित्ताने भाजप खासदार रवी किशन यांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी, त्यांना शाल श्रीफळ देऊन आदर सन्मान केला गेला. यानंतर, ते खुर्चीवर बसत असतानाच अचानक ते खालीच पडले. सुदैवाने या प्रकारामुळे रवी किशन यांना कोणतीही दुखापत झाली नाही.हा व्हिडिओ २० नोव्हेंबर रोजी संध्याकाळचा असल्याचे समजते आहे. गोरखपूरच्या मोहाडीपूर हायडिल कॉलनीमधील छठ पुजेच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते.

 

दरम्यान, छठ पुजेवरुन बरंच राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. देशभरात कोरोनाचं संकट असल्याने अनेक राज्यांनी छठ पुजेच्या सार्वजनिक समारंभास बंदी घातली होती. तशीच बंदी दिल्ली सरकारने देखील घातली होती. त्यावरुन भाजप खासदार मनोज तिवारी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिका केली होती. दिल्लीत छठ पुजेवर बंदी घातल्यानंतर तिवारी यांनी केजरीवाल यांना थेट ‘नमकहरम’ मुख्यमंत्री असं म्हटलं होतं. भाजप नेते मनोज तिवारी यांच्या ‘ऑफिस ऑफ मनोज तिवारी’वरुन करण्यात आलेलं वादग्रस्त ट्वीट त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन रिट्विट देखील केलं होतं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here