13 महिने 14 दिवसांपासुन फरार असलेला आरोपी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या ताब्यात

bhuswal-crime

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दिनांक 14.10.2019 रोजी रात्री 23:30 वा.सुमारास फिर्यादी नामे पवन ऊर्फ प्रविण रविंद्र येवले वय – 24 रा.पंचशिल नगर भुसावळ यास भुसावळ शहरातील जुने तालुका पो.स्टे जवळील भाजी मार्केट येथे आरोपी नामे नागेश बाळु सोनवणे वय – 23 रा.पंचशिल नगर शर्मा हॉस्पिटल जवळ याने फिर्यादीशी हुजत घालुन शिवीगाळ करुन चाकुने पोटावर मारुन गंभीर दुखापत केली म्हणुन फिर्यादी यांनी भु.बा.पेठ पो.स्टे ला फिर्याद दिल्याने भाग 5 गु.र.न 516 / 2019 भा.द.वि.क.326,323,504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन तेव्हा पासुन या गुन्हयातील आरोपी हा ( 1 वर्ष 1 महिना 14 दिवस ) झाले फरार होता.

 

 

दि. 28.11.2020 रोजी भुसावळ शहरात पंचशिल नगर येथे आरोपी नागेश सोनवणे हा आला असल्याची गुप्त माहीती पो.नि. दिलीप भागवत यांना मिळाल्याने पो. अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे, अपर पो. अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप.पो.अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो. निरी.दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि.अनिल मोरे, स.पो.नि मंगेश गोटाले, सफौ. ग्योसोदीन शेख , कृष्णा देशमुख , तस्लीम पठाण पो.हे.कॉ.वाल्मीक सोनवणे पो.ना रविंद्र बिऱ्हाडे, रमन सुरळकर ,उमाकांत पाटील पो.कॉ विकास सातदिवे,सचिन चौधरी,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी,चेतन ढाकणे,सुभाष साबळे,योगेश माळी यांनी तात्काळ तेथे जावुन त्यास ताब्यात घेतले असुन सदर गुन्हयाचा तपास पो.हे.कॉ वाल्मीक सोनवणे करीत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here