मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – जोगेश्वरी पूर्व येथील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आज संत शिरोमणी नामदेव महाराज यांची ७५० वी जयंती जोगेश्वरी पूर्व, दुर्गा नगर येथे असलेल्या नामदेव महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात व भक्तिमय आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी संत नामदेव यांच्या मूर्तीची अध्यक्ष उल्हास मोळातकर यांच्या शुभहस्ते यथायोग्य पूजाअर्चा करून , नामदेवांची आरती गाऊन , सर्व समाज बांधवांना प्रसाद देण्यात आला. तसेच जोगेश्वरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांच्यातर्फे सर्व उपस्थितांना आरोग्यदायी असे तुळशीचे रोपटे भेट देण्यात आले.

विशेष म्हणजे सोशल डिस्टनसिंग व इतर सर्व नियमांचे पालन करून हा कार्यक्रम साजरा करण्यात आल्याचे मंडळाचे सहसचिव गणेश विंचू यांनी सांगितले. तसेच सचिव नरेंद्र माळवदे यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे आभार मानले, अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.







