मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मुहुर्त कलेचा अभिमान संस्कृतीचा कुलस्वामिनी निर्मित आणि श्रद्धा कलामंच प्रकाशित लाॅंग लाईफ नाटकाचा मुहूर्त संपन्न झाला. मायबाप रसिक प्रेक्षकांचे टेन्शन दुर करुन पोट धरुन खळखळवुन हसवणार्या ” लाँग लाईफ ” या दोन अंकी नाटकाच्या स्र्किप्टचा मुहुर्त निर्माते विश्वास धोंडु मांजरेकर यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्या डॉ. अपर्णा प्रभु यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी नाटकाचे लेखक / दिग्दर्शक व कलाकार श्री. प्रकाश माचकर , तसेच संदिप येलवे , सुरेश रासकर , कल्पना कदम , यशवंत शिंदे , स्वप्निल कानेरकर , मिनाक्षी डोंगरगांवकर , विलक्षणा मोरे. हे सर्व कलाकार उपस्थित होते. या नाटकाचे पार्श्वसंगीत व शिर्षक गीताची बाजु सांभाळणारे श्री. आनंद कुबल , रंगभुषाकार श्री. चंदर पाटील यावेळी आवर्जुन उपस्थित होते.
हरी पाटणकर आणि भालचंद्र नाईक या नाटकाचे व्यवस्थापक आहेत. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला रंगभुमीवर येत आहे.या नाटकाची तालीम सुरु झाली असुन , सर्व कलाकार कसुन सरावाला लागलेले आहेत.







