जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जामनेर तालुक्यातील नाचणखेडा या वस्तीत जळगाव केअर युनिट मार्फत सर्वेक्षण व आरोग्य
तपासणी करण्यात आली होती यात ३२१३ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले व त्या पैकी ९११ लोकांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार देण्यात आला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन सरपंच राजेंद्र चौधरी ,चांदा पटेल, शोएब पटेल व रज्जाक पटेल यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले त्या वेळी व्यासपीठावर कोविड केअर युनिट चे प्रमुख मुफ्ती अतिक,अध्यक्ष गफ्फार मलिक, जनसंपर्क प्रमुख फारुक शेख सह नाचणखेडा येथील हाफिज बासीत, हाफिज गुलाम अहमद पटेल, मुशिर मन्यार इलियास पटवे, इकबाल सेठ, कालू पटेल व अल्ताफ शेख यांची उपस्थिती होती.
सरपंच चौधरी यांनी उद्घाटनपर बोलतांना कोविड केअर युनिट च्या कार्याचे कौतुक करून सदर युनिट हे शहरा सोबत ग्रामीण विभागात काम करीत असल्याने लोकांच्या मनातील भीती सह कोरोना ची भीती जात आहे.
मुफ्ती अतिक यांनी विशेष प्रार्थना केली अध्यक्षीय भाषणात गफ्फार मलिक यांनी सांगितले की प्रत्येक गावकऱ्यांनी व समाजसेवकांनी पुढे येऊन प्रत्येक गावात अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराचे आयोजन करावे अथवा ज्यांना ते शक्य नसेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. जनसंपर्क प्रमुख फारुक शेख यांनी पंधरा वैद्यकीय शिबिराचा आढावा ग्रामस्थ समोर सादर केला.
समारोपीय कार्यक्रम
नाचण खेडा येथे कोविड केअर तर्फे आरोग्य तपासणी शिबीर सुरू असल्याची बातमी तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांना लागताच त्यांनी शिबिराचे ठिकाण गाठले व शिबिरा मधील गर्दी जळगाव येथील २०डॉक्टरांचे पथक , १५ लोकांची सर्वेक्षण टीम व औषधी देणारी टीम बघून त्यांनी समारोपीय कार्यक्रमात सर्व डॉक्टरांचे कौतुक केले एवढ्यावरच न थांबता मागच्या आठवड्यात आम्ही याठिकाणी शासनातर्फे शिबिराचे आयोजन केले होते तेव्हा आम्हास काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता परंतु आज पूर्ण नाचणखेडा या ठिकाणी तपासणी करून घेत आहे हे बघून आनंद झाला असे वक्तव्य तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी व्यक्त केले व शासनातर्फे त्यांनी गफ्फार मलिक व फारूख शेख यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला.
नाचण खेडा येथे या वीस डॉक्टरांची सेवा लाभली
डॉक्टर जावेद शेख ,रियाझ बागवान ,मतीन खाटीक ,अब्दुल रहीम शेख ,वसी अहेमद,अझीझुल्लाह शेख,वकार शेख इम्रान खाटीक ,तौसिफ शेख, नसीम अन्सारी ,फिरोज शेख ,आसीम खान, वसीम कुरेशी, रिजवान खाटीक,कु आफ्रीन मुख्तार शेख,कु, सायमा असलम खान ,सय्यद महेजबिन, जामनेरचे डॉक्टर शेख मुशर्रफ नाचणखेडा चे डॉक्टर अब्रार पटेल यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधोपचार दिला एवढेच नव्हे तर त्यातील काही रुग्णांचे समुपदेश सुद्धा केले.
नाचण खेडा येथील कार्यकर्ते
मुसगीर मन्यार, आसिफ मनियार, इलीयास पटवे, आसिफ देशमुख, जाहेद पटेल , आदिल देशमुख हाफिज आसिफ ,जहांगीर सलाम पटेल यांनी शिबिर यशस्वितेसाठी प्रयत्न केले.
जळगाव येथील योद्धे कार्यकर्ते
अनिस शाह,अल्ताफ शेख, आबिद शेख, अमीर शेख, अर्षद शेख ,अजीम रफीक, रफिक मणियार , मुजाहिद खान जाकीर खान सर,, फैजान शेख ,मोहसीन मणियार ,अकील शेख, हुसेन ,मुजाहिद शेख, रफिक शेख, शाहिद शेख, शेख यांनी नोंदणी व वैद्यकीय सेवेसाठी यशवी कार्य केले.
नाचणं खेडा मार्फत अभिनंदन
आमच्या गावचे अल्पसंख्याक समाजाचे १० नागरिक कोरोना मुळे वारले म्हणून येथे घाबरलेले होते परंतु आमच्या छोट्याश्या विनंतीला मान देऊन कोविड केअर युनिट चे गफ्फार मलिक व फारूक शेख यांनी २० डॉक्टरांचा ताफा घेऊन आले व सोबत सर्व सहकारी घेऊन आले म्हणून त्यांचा सर्वांचा गावकऱ्यांनी पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला.







