नववधूचा खुन करणाऱ्याला फाशी द्या, शिवसेना महिला आघाडीची मागणी

धरणगाव (योगेश पी पाटील) – धरणगाव येथे शिवसेना महिला आघाडी तर्फे तहसीलदार नितिन कुमार देवरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले यांना वैष्णवी नारायण गोरे रा. मंठा जि. जालना या नवविहाहीत व तिचा कुटुंबाला न्याय मिळावा हि मागणी करण्यात आली , शिवसेनेचे रणरागिणी निवेदन सादर केले
जालना जिल्ह्यातील मंठा या गावात वैष्णवी नारायण गोरे या मुलीच्या एका नराधमाने दिवसाढवळ्या भर रस्त्यात खून केल्याची घटना घडली. दुर्दैवाची बाब म्हणजे तिच्या पाच दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. लग्नानंतर पहिल्यांदा ती माहेरी आली होती. तिचे वडील रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होते आर्थिक परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. अशा परिस्थितीत त्यांनी मुलीचे लग्न केले लग्नानंतर पाच दिवसांनी त्यांना आपल्या मुलीच्या दुर्दैवी अंत बघावा लागला. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक मुलीला सुरक्षितता वाटली पाहिजे प्रत्येक स्त्री ला निर्भयपणे जगता आले पाहिजे असा कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित होणे गरजेचे आहे. अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा उद्धव साहेब ठाकरे व पालक मंत्री मा गुलाबरावजी पाटील याचांकडे तिला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी करणार आहेत.
शिवसेना तालुका धरणगाव व महिला आघाडी वतीने पुढील प्रमाणे मागण्या करण्यात येत आहे.
1) वैष्णवी गोरेंच्या खुनाचा पोलीस यंत्रणेद्वारा निष्पक्ष कोणतीही त्रुटी न राहता कमीत कमी वेळात तपास पूर्ण करून माननीय न्यायालयात खटला दाखल करणे.
2) हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात दाखल करणे.
3) तज्ञ सरकारी वकिलांची नेमणूक करणे.
4) पोलीस स्टेशनला मुलींचे छेडखानी बाबत तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेणे व कार्यवाही करणे.
5) निर्भया पथकाची जास्तीत जास्त संख्येने स्थापना करणे व मुलींमध्ये निर्भयता जागृती जागृती निर्माण करणे.
आम्ही शिवसेना महिला आघाडी व पदाधिकारी या घटनेचा निषेध करीत असुन, संबंधित आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती करीत आहोत, या गोष्टी ची ताबडतोब कार्यवाही न केल्यास आम्ही सर्व नारी शक्ति या पुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आहोत.
यावेळी उपस्थित धरणगाव माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, नगरसेविका अंजली भानुदास विसावे ,कीर्ती किरण मराठे, आराधना नंदलाल पाटील, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख रत्नाताई धनगर, सुनिता चौधरी, प्रा. कविता रमेश महाजन, हेमांगी अग्निहोत्री, भारतीताई धनगर इत्यादी महिला उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here