उर्मिला मातोडकरांचा शिवसेना प्रवेश मुहूर्तावर संजय राऊतांकडून शिक्कामोर्तब

urmilla-matondkar-and-sanjay-raut

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवणार्‍या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर उद्या (ता.०१) शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोंडकर यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ऊर्मिला या नावाजलेल्या अभिनेत्री असून अनेक हिट चित्रपटातून त्यांनी नायिकेच्या भूमिका केल्या आहेत.

 

 

गेल्या लोकसभा निवडणुकीत ऊर्मिला यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला. मात्र काँग्रेसच्याच काही नेत्यांनी आपल्याविरोधात काम केल्याने पराभव झाला, असा आरोप करून ऊर्मिला मातोंडकर यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. अभिनेत्री कंगना राणावतने शिवसेना, तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल केला, तेव्हा ऊर्मिलाने सडेतोड प्रत्युत्तर देऊन राज्य सरकारची बाजू उचलून धरली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here