मुंबई (विशेष प्रतिनिधी) – लोकजागर ओबीसी जनगणना सत्याग्रह अभियानाचे सर्वेसर्वा मा. प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी राज्यात ओबीसी जनगणने ची त्रिसूत्री दिनांक 18 ऑक्टोबर 2020 पासून राज्यात सुरु केल्यामुळे पोलीस विभागातील सीआयडी विभागा कडून चौकशीचा ससेमीरा निवडक पदाधिकारी यांच्या मागे लागला आहे. लोकजागर अभियानचे कार्य सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात दखलपात्र असल्याने याची नोंद, माहिती, चौकशी पदोपदी सरकारी यंत्रणा कडून घेत आहेत.
लोकजागर चे सत्याग्रह अभियान राज्यात सुरु झाले तेव्हा पासून गृह विभागा कडून लोकजागरची चौकशी होणे यातच सर्व पदाधिकारी, जिल्हा व तालुका समन्व्यक, सत्याग्रही संघटक यांचे मोठे यश आहे. म्हणजेच सत्ता परिवर्तनाची कठोर पूर्वपरीक्षा आपण उत्तीर्ण झालो आहोत असा याचा अर्थ आहे.
लोकजागर अभियानात काम करणारे पदाधिकारी, ओबीसी बांधव उच्चशिक्षित, अनुभवी, आणि प्रामाणिक असल्यामुळे सर्वांच्या नजरा लोकजागर अभियानाकडे कडे आहेत, हे विसरून चालणार नाही. “लोकजागर में कुछ तो दम है”असे आता सर्वच म्हणू लागले आहेत.
राज्यकर्त्याची झोप लोकजागरने अभियानाने उडविली हे सत्य असून याचे श्रेय लोकजागर अभियानाच्या च्या सर्व पदाधिकारी, सदस्य व सत्याग्रहींना आहे, यात दुमत नाही.कारण, सरकारी तपास यंत्रणा जेव्हा आपल्या अभियानाचे कौतुक करते यावरून आपण योग्य दिशेने
वाटचाल करीत आहोत हे सिद्ध होते. अर्थात, यामागे ज्ञानेश वाकुडकर साहेब -संस्थापक अध्यक्ष, महादेव मिरगे साहेब- राष्ट्रीय महासचिव, रविंद्र रोकडे साहेब- सोशल मिडिया प्रभारी यांचे अहोरात्र परिश्रम आहेत.







