नवी दिल्ली – राज्यसभा खासदार यांचे आज (मंगळवार) चेन्नईमधील रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. भारद्वाज यांना कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांच्यावर चेन्नईत उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींनी दु:ख व्यक्त केले आहे.
एक महिन्यापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांचे आज निधन झाले. अभय भारद्वाज गुजरातमधून भाजपने उमेदवारी दिल्यानंतर राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून केले होते. ते एक प्रतिष्ठीत वकील होते. तसेच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग होता. देशाच्या विकासासाठी विचार करणाऱ्या व्यक्तीला देशाने गमावले आहे, असे ट्विट मोदींनी करत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांसोबत मोदींनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.







