राजगृहावर करण्यात आलेला हल्ला निषेधार्ह

नाशिक (तन्मय गांगुर्डे) – भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे. आरोपींना तात्काळ अटक होऊन कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्वत्र करण्यात येत आहे.
बाबासाहेबांचे मुंबईतलं निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतील राजगृह. दोन अज्ञात व्यक्तींनी काल राजगृहच्या परिसरातील नासधूस केली. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी १९३० च्या दशकात हे घर खास बांधून घेतलं होतं. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचे वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये वस्तूसंग्रहालय आहे.
डॉ.आंबेडकरांनी आणि रमाबाईंनी वापरलेल्या विविध वस्तू, फर्निचर, पितळेची भांडी इथे आहेत. या सगळ्यांसोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथे त्यांचे टेबल, त्यांच्या संग्रहातील काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाची प्रत आणि त्यांचा चष्याही इथे पहायला मिळतो. महामानवाचे घर म्हणून अनेकांचे श्रध्दास्थान असलेल्या या घरावर झालेला हल्ला निषेधार्ह असून, आरोपींना तात्काळ अटक होवून कठोर कारवाई करावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here