जळगाव (संपादक सुनिल पाटील) – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील चव्हाण कुटुंबियांची सुकन्या आणि एरंडोल तालुक्यातील कासोदा या गावातील सूर्यवंशी परिवाराची सून असलेली दिपिका चव्हाण सूर्यवंशी सध्या कॅनडातील ग्रॅण्ड प्रेरी, अल्बर्टा येथे स्थायिक आहे.
दि. २७ जुलैला कॅनडातील एडमिंटन शहरात घेण्यात आलेल्या व्हाईस ऑफ इमोशन या स्पर्धेत दिपिकाने सहभाग घेतला होता. जवळपास तीन महिने चाललेल्या या स्पर्धेत तिच्या आवाजाची जादू चालली आणि या स्पर्धेच्या विजेतेपदावर तिने आपले नाव कोरले आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत असून, तिचे बुलंद पोलीस टाइम्सतर्फे हार्दिक अभिनंदन!








