पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुणे येथे चंदेरी दुनियेचे स्वप्न घेऊन सर्वच येतात तशी कर्नाटक मधील बस्वकल्याण या छोट्या गावातून आलेली अंबिका यांनी पुणे विद्यापीठ मध्ये उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करून जॉब केला.जॉब करत असतांना त्यांना फिल्म इंडस्ट्री ची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी मनातलं प्रेम ही शॉर्ट फिल्म केली.
स्वत:चा ग्लॅमरस लूक असलेली अंबिकाने मग मागे वळून बघितले नाही मराठी फिल्म मध्ये एंट्री केली लवकरच तिचा चित्रपट प्रदर्शित होईल.पितृ छत्र हरवल्या मुळे एकाकी असलेल्या अंबिका ला आई विजयालक्ष्मी यांनी खूप साथ दिली. छोटा भाऊ दहावीला असून अंबिका एकटी घरात कमावती असून तिच्या वर घर चालत असून ती स्वत: चे स्वप्न ही पूर्ण करत आहे.
आयुष्याच्या चढऊतारात मग अंबिकाची ओळख रॉयलचे यशस्वी आयोजक नितिन झगरे यांच्याशी झाली अन त्यांनी अंबिकाला खूप सपोर्ट करुन मॉडेलिंग मधील बारकावे शिकवले.मग चार्मिग स्टार ऑफ इंडिया आणि महाराष्ट्राची फेव्हरेट सौंदर्यकन्या या दोन्ही ऑनलाईन शो मध्ये यश संपादन करत अंबिका ने यशस्वी सुरूवात केली. 
आज अंबिका यशस्वी मॉडेल बनली आहे.घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे जॉब शिवाय पर्याय नसल्याचे म्हटली ,पण फिल्म इंडस्ट्री मध्ये करिअर करणार असल्याचे सांगितले ऐमेज़ॉन मध्ये जॉब करत असून लवकरच सर्व स्वप्न पूर्ण होतील.मॉडेलिंग ,ऐक्टिंग,डान्सची आवड असलेली अंबिका सर्व गोष्टी मध्ये परिपुर्ण आहे.नितिन झगरे यांच्यामुळे मी यशस्वी झाले असल्याचे अंबिकाने बुलंद पोलीस टाइम्सचे प्रतिनिधी सुनिल भोसले यांना सांगीतले.







