रावेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे सत्कार समारंभ

raver-congress

रावेर (प्रतिनिधी हमीद तडवी) – रावेर तालुका काँग्रेस कमिटीतर्फे विविध क्षेत्रातील नियुक्ती झालेल्या मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी बोलताना जळगाव जिल्हा काँग्रेस शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष शैलेश राणे यांनी सांगितले की सत्कारामुळे पुढील कार्यास प्रेरणा मिळते .

 

महाराष्ट्र शासन मान्य नोंदणीकृत ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या रावेर तालुका अध्यक्षपदी संजिवनी मेडीकल रावेरचे संचालक सुनील महाजन तसेच कार्यवाहकपदी रावेर येथील सरदार जी जी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्रा आर आर उपाध्ये यांची निवड झाल्याबद्दल व रावेर तालुका शिक्षक सहकार गटाच्या उपाध्यक्षपदी सरदार जी जी हायस्कूलच्या उपशिक्षिका व रावेर तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा सौ. मानसी पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी रावेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा श्रीमती कांताताई बोरा, रावेर तालुका काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष विनायक महाजन, मा. नगरसेवक अँड योगेश गजरे, श्री लहासे, श्री. सुरदास, संतोष पाटील, जगन महाजन व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 

raver-congress-party

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here