मुंबई (उपसंपादक प्रशांत भिसे) – महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने आयोजित ‘फिश-ओ-क्राफ्ट’कौशल्य विकास कार्यशाळेचे उद्घाटन राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांच्या हस्ते करण्यात आले.

मत्स्यविभागाच्या विविध योजनांचे लाभ खऱ्या अर्थाने मत्स्य शेतकऱ्यांना मिळावेत व मत्स्योत्पादनात वाढ व्हावी, यादृष्टीने अशा स्वरुपाच्या कार्यशाळा मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने आयोजित केल्या जात आहेत. मत्स्य कातडीचा मत्स्य जिलेटीन व इतर सौंदर्य उत्पादनांकरिता (By-Product) वापर करण्याचं प्रशिक्षण आज आयोजित केलेल्या कार्यशाळेत देण्यात आलं.

आधुनिक तंत्रज्ञान व मत्स्य शेतकऱ्यांचा कौशल्य विकास यावर राज्य शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग भर देत आहेत. या प्रसंगी मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री मा. ना.श्री.दत्तात्रय भरणे जी, आयुक्त मत्स्यव्यवसाय महाराष्ट्र राज्य डाॅ. अतुल पाटणे जी व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.







