धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी.पाटील) – महाराष्ट्र ग्रंथालय सेनेच्या उपप्रमुखपदी निवड़ झल्याबदल धरणगांव पंचायत समिती सभापती मुकुंद नन्नवरे यांनी धरणगांव पंचायत समिती कार्यालयात त्यांचा शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी जळगांव ग्रामीण विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शिवसेना महिला तालुका प्रमुख अश्विनी भाटिया, युवासेनेचे आबा महाजन,अहिरे सरपंच दादाभाऊ पाटील, सोनवद येथील सामाजिक कार्यकर्ते किरण भाटिया आदि उपस्थित होते.
पी.एम.पाटिल यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, चर्मकार समाजाचे नेते भानुदासआप्पा विसावे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, महिला जिल्हा प्रमुख सौ.महानंदाताई पाटील व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.







