जनमत प्रतिष्ठान व सेवाश्रम फाऊंडेशनतर्फे गाडेगावला औषधे व मास्क वाटप

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आदर्श गाव म्हणून ओळखले जाणारे गाडेगाव तालुका जामनेर येथे दिनांक ८ जुलै २०२० रोजी जनमत प्रतिष्ठान व सेवाश्रम फाऊंडेशन जळ्गाव तर्फे संपुर्ण गावाचे सेनिटायजेशन करण्यात आले.तसेच गावातील लोकांना मास्क व अर्सेनिक गोळ्यांचे वाटप करुन जनजागृती करण्यात आली.या प्रसंगी जनमत प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री पंकज नाले व सेवाश्रम फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री विवेक ठाकरे यांनी गावतील कोरोना पेशंट नेगेटिव होवुन बरे झालेल्या सरपंच सौ सुलभा भारंबे व प्रल्हाद भारंबे या दोघांचा सत्कार ही केला .त्यांच्या या उपक्रमात शिक्षक भारती च्या महिला आघाडी च्या अध्यक्षा श्रीमती शितल संजय जडे, कुणाल संजय जडे व हर्षाली पाटील यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here