आंबेडकर कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा द्या – वंचित बहुजन आघाडी शिंदखेडा यांची मागणी

दोंडाईचा (संतोष कोळी) – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले राजगृहावर दि. ७ जुलै रोजी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
राजगृह हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्वाचे ठिकाण आहे.
दि. ७ जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केला आहे. यात त्यांनी घराबाहेरील सीसीटीव्ही चे मोठे नुकसान केलंय. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. आंबेडकर कुटुंबियांकडून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी बहुजन आघाडी शिंदखेडा यांनी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here