न्हावी (डॉ.मोहन साळुंके) – यावल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र हिंगोणा अंतर्गत व न्हावी आरोग्य केंद्रातर्फे न्हावी गावातील नागरिकांची कोरोना विषाणू संदर्भात तपासणी करण्यात आली.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनातर्फे घरोघरी आशा वर्कर महिलांच्या माध्यमातून कोरोनाची माहिती देण्यात आली.तसेच थर्मल पॉवर मशीननेेे नागरिकांची तपासणी करून जनजागृती करण्यात आली. ही मोहीम न्हावी गावात सकाळी 09:00 वाजेला सुरू करण्यात आली.यावेळी आशा वर्कर मंगला रामा कोळी, तसेच आरोग्य सेविका व मदतनीस सिंधुबाई किशोर चौधरी, पुष्पा प्रकाश लोंढे,जयश्री लोमेश चौधरी, शकुंतला सुरेश लोंढे या महिला उपस्थित होत्या.







