दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील सी.बी.एस.ई.शाळांच्या ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या आंतरशालेय ऑनलाईन योगानृत्य स्पर्धेत श्रीमती मंदाकिनी टोणगांवकर रोटरी इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कु.निमिषा खडसे हिने मध्यम गटात उत्कृष्ट योगानृत्य सादर करून स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला.
या आंतरशालेय स्पर्धा पहिली ते दुसरी,तिसरी ते पाचवी,सहावी ते आठवी,नववी ते दहावी अशा चार गटात घेण्यात आल्या.प्रत्येक शाळेचे दोन विद्यार्थी सहभागी होण्याची अट होती.सहावी ते आठवीच्या मध्यम गटात कु.निमिषा हिने लवचिकता, वेळमर्यादा,योग्य आसनस्थिती, आसन कार्यक्षमशैली,योगासन धारणा या निकषांना अनुरूप उत्कृष्ट योगानृत्य सादर केले.यशस्वी खेळाडूला क्रीडाशिक्षक श्री. अजय हजारे यांचे ऑनलाईन मार्गदर्शन लाभले.
रोटरी स्कूलचे अध्यक्ष हिमांशू शाह, उपाध्यक्ष डॉ. मुकुंद सोहोनी, सचिव डॉ. राजेश टोणगांवकर, डॉ. रवींद्रनाथ टोणगांवकर, डॉ. आशाताई टोणगांवकर, प्राचार्य एम.पी. पवार यांनी कु. निमिषा खडसेचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले.







