खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

jaisidheshwar-swami

सोलापूर (प्रतिनिधी) – पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदानावेळी सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांनी आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पंढरपूर विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.

 

जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करून पदावरून निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली होती.

 

सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी मंगळवारी (दि. 1 डिसेंबर) पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या मतदान प्रक्रियेदरम्यान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हे पंढरपूर शहरातील द. ह. कवठेकर प्रशाळेत 190 क्रमांकाच्या मतदान केंद्रात थेट प्रवेश केला होता. केंद्रावर जाऊन प्रत्यक्षरीत्या तेथे मतदान करणाऱ्या मतदारांवर प्रभाव पाडण्याच्या हेतूने केंद्रात प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

मंगळवारी विधानपरिषदेच्या जागांसाठी निवडणूक सुरू असताना पंढरपुरातील द.ह. कवठेकर प्रशालेत दुपारी 3 वाजून 20 मिनिटाच्या सुमारास भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी हे मतदान केंद्रात आले होते. हा प्रकार पाहून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्यासाठी आवश्‍यक परवानगी आहे का, अशी विचारणा खासदारांकडे केली. पण, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांच्याकडून समाधानकारक उत्तम मिळाले नाही. निवडणूक कर्मचारी आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणालाही मतदान केंद्रात प्रवेश करता येत नाही. मात्र, भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी थेट मतदान केंद्रात कसा प्रवेश केला, याविषयी आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here