गोरगरीबांना न्याय देणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना – संपर्कप्रमुख बबनराव थोरात

shirpur

शिरपूरच्या आदिवासी भागात घुमला जय महाराष्ट्रचा नारा

शिरपूर (प्रतिनिधी) – गोरगरीबांना न्याय देणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना आहे. इथे सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्यांला मान दिला जातो, असे प्रतिपादन शिवसेनेचे धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी येथे केले. शिवसेनेचे सदस्य नोंदणी अभियान, शिवसेना शाखा नामफलक अनावरण, नवमतदार नोंदणी तसेच पक्षसोहळा असे विविध कार्यक्रम धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा मतदार संघात आदिवासी भागातील वासर्डी गावात संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.Shirpur-shivsena

 

शिवसेना शाखा नामफलकाचे अनावरण धुळे आणि नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख श्री.बबनराव थोरात यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी सहसंपर्कप्रमुख अतुल सोनवणे, धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, हिलाल माळी, अतुल श्रीवर्धनकर, उपजिल्हाप्रमुख भरतसिंह राजपुत, महिला आघाडीच्या ज्योतीताई पाटील, वीणाताई वैद्य, शिरपूर तालुकाप्रमख अत्तरसिंग पावरा, दीपक चोरमले, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शिंदखेडा तालुकाप्रमुख गिरीश देसले, माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, विधानसभा क्षेत्रप्रमुख छोटू पाटील, विभाभाई जोगराणा, शिरपूर शहरप्रमुख मनोज धनगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.shivsena-sadsya-nondani

 

याप्रसंगी बोलतांना संपर्कप्रमुख बबनराव थोरात म्हणाले की, गोरगरीबांना न्याय देणारी एकमेव संघटना म्हणजे शिवसेना आहे. इथे सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्यांला मान दिला जातो. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी गरीब घरातील शिवसैनिकांना मानाचे स्थान दिले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून अनेक समाजपयोगी निर्णय घेतल्याने जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. शिरपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी सामान्य जनतेत मिसळून काम करावे, शिवसेनाला आगामी काळात निश्चितपणे यश मिळेल, असेही श्री.थोरात म्हणाले.

 

यावेळी जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनीही मार्गदर्शन केले. तालुकाप्रमुख अत्तरसिंग पावरा आणि दीपक चोरमले यांनी तालुक्यातील विविध समस्या मांडल्या. तालुक्यातील प्रश्नांबाबत लवकरच धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे म्हणत थोरात यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केले. शिवसैनिकांनी संपूर्ण गावच भगवे झेंडे लावून भगवामय वातावरण निर्माण केले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here