दिल्ली शेतकरी मोर्चाला पाठिंब्यासाठी चोपडा काँग्रेसचे धरणे आंदोलन; भाकपही सहभागी

chopada-congress

चोपडा (प्रतिनिधी संदीप ओली) – शहर आणि तालुका काँग्रेस तर्फे 3 डिसेंबर रोजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड संदिप सुरेश पाटील यांचे नेतृत्वाखाली दिल्लीतील शेतकरी मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी,व मोदी सरकारने पास केलेले काळे कृषी कायदे रद्द करण्यासाठी, चोपडा तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.

 

 

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पार्टी नेहि सहभाग घेतला यावेळेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड संदिप पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे नेते काॅ अमृत महाजनयानी केंद्र सरकारच्या धोरणावर कडक टीका केली. धरणे दरम्यान केंद्र सरकार जनतेत जाती-धर्माच्या नावाने फूट पाडणाऱ्या कट-कारस्थान विरोधात व अदानि अंबानीधार्जिन्या धोरणाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

 

 

यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष सुरेश पाटील, जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील, तालुकाध्यक्ष राजाराम पाटील, शहर अध्यक्ष के. डी. चौधरी, मार्केट कमिटीचे मा . ऊपसभापती नंदकिशोर सांगोरे , सूतगिरणीचे संचालक राजेंद्र पाटील, शिरीष बडगुजर, युवक काँग्रेसचे अध्यक्ष किरण सोनवणे, दिलीप जैन, ॲड. संदेश जैन, अकबर पिंजारी, ईलियास पटेल, एन एस यू आय अध्यक्ष चेतन बाविस्कर, सोहन सोनवणे, विशाल भोई, राहुल निकुंभ , सतिश पाटील,साखर कारखाना संचालक गोपाल धनगर, प्रदीप पाटील, रमाकांत सोनवणे, अॅड. ए ए जहागीरदार, धारासींग बारेला , रमेश एकनाथ शिंदे, कांतीलाल जगतराव सनेर, ॲड एस डी पाटील, चिरागोद्दीन जहागीरदार, डाॅ . अशोक कदम, गोपीचंद रघुनाथ चौधरी, सूर्यकांत के. चौधरी, अशोक साळुंखे, मेहमूदअली सैय्यद, आदि काग्रेस कार्यकर्ते भाकपाचे कॉम्रेड वासुदेव कोळी शांताराम पाटील संतोष कुंभार .काळू पारधी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

 

 

हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा अॅड संदिप पाटील यांनी दिला. धरणे आंदोलन शेवटी तहसीलदार श्री वाघ यांना चोपडा तालुकाकिसान संघर्ष समितीतर्फे दिल्ली येथे चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शक निवेदन देण्यात आले

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here