पुणे (कार्यकारी संपादक निलेश बटाणे) – कोकणातील मच्छीमारांना एकत्र आणून, कोकणातील सागरी समृद्धी, मत्स्य उत्पादने जगभर घेऊन जाणारा ‘गोको ‘ या ब्रँडची वेबसाईट, ई कॉमर्स प्लॅटफॉर्मचे उद्घाटन गुरूवारी पार पडले.राज्याचे मत्स्य विभागाचे आयुक्त अतुल पाटणे यांच्या हस्ते या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
कोकणातील समुद्रातील ताजे मासे थेट समुद्रातून मत्स्यप्रेमी ग्राहकांच्या घरामध्ये घरपोच अशा स्वरूपाची सुविधा आजपासून ग्लोबल कोकण च्या माध्यमातून ‘टीम गोको ‘हे काम प्रत्यक्ष करणार आहे. या वेबसाइट आणि प्लॅटफॉर्मच्या माध्यम मधून जगभर कोकणातील जागतिक दर्जाच्या उत्पादनांचे ऑनलाइन मार्केटिंग करण्यात येईल.
या उपक्रमाचे संचालक सुशांत रावराणें, दीप्तेश जगताप, संचालक संतोष सावंत यावेळी आवर्जून उपस्थित होते. कोकण बिझनेस फोरमचे जगभर काम करत असलेले कार्यकर्ते एकत्र येऊन देशातील अत्याधुनिक कोळंबी शेतीचा प्रकल्प आर.ए.एस.तंत्रज्ञानाच्या मदतीने पुढील सहा महिन्यात रत्नागिरी येथे सुरू होत आहे.
अमेरिकेमधील संजय सावंत, ऑस्ट्रेलियामधील सतीश सावंत बंगलोर मधील राजेश सावंत, कॉर्पोरेट क्षेत्रातील सचिन कुलकर्णी व टीम गोको अशी कोकण बिझनेस फोरमची ग्लोबल टीम या प्रकल्पाची निर्मिती करणार आहे. याची माहिती व प्रेझेन्टेशन मस्य आयुक्तांना दिले .
ग्लोबल कोकणच्या माध्यमातून ” ग्लोबल कोकण हेल्थ फूड ” ही महत्वपूर्ण योजना शुभारंभ करण्यात आला. देशभरातील कोकणी व मराठी बांधवांना व अन्य प्रदेशातील मत्स्यप्रेमी कोकणप्रेमी जनतेला या योजनेत सदस्य म्हणून सहभागी होत आहे. अतिशय दर्जेदार, ब्रँडेड जगप्रसिद्ध कोकणातील उत्पादने घरपोच ई कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून व कोकणदूत, ग्लोबल कोकणच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मुंबई नाशिक पुणे व देशभर घराघरांमध्ये पोचवण्याचे काम टीम गोको करील.
गोको ब्रँड च्या माध्यमातून जागतिक दर्जाची कोकणी उत्पादने घराघरांमध्ये मार्केटिंग करण्याचा व्यवसाय मराठी व कोकणी तरुणांना अतिशय कमी गुंतवणुकीत करता येईल. याकरिता मुंबई पुणे नाशिक येथे ग्लोबल कोकण च्या माध्यमातून कोकणदूत यांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत
यासंदर्भात अधिक माहितीसाठी सचिन कोठारकर +91 98332 67817 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संजय यादवराव,संस्थापक ग्लोबल कोकण,गोको ब्रँड यांनी केले आहे.







