बोदवड (विशेष प्रतिनिधी) – येथील पंचायत समितिचे तात्कालिन गट विकास अधिकारी आर. ओ. वाघ यांच्या कालावधीत झालेल्या रमाई घरकुल योजना चौदावा वित्त आयोग. स्वच्छ भारत मिशन दलित वस्ती सुधार योजना रोजगार हमी योजना संरक्षण भिंत बांधकाम बोरगाव कोल्हाडी सह अनेक संरपच सदस्य. व सामाजिक कार्यकर्ते यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून गैरप्रकार भष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घातले या बाबतीत तक्रार दार यांची आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे चौकशी चौकशीची मागणी केली असता आमदार चंद्रकांत पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला असता विभागीय आयुक्त नाशिक यांनी एक चौकशी पथक पाठविले होते.
तात्कालिन गट विकास अधिकारी आर. ओ वाघ यांनी मागासवर्गीय पात्र रमाई घरकुल योजनेच्या 200 घरकुल उद्दिष्टे कमी केले होते. स्वच्छ भारत मिशन मध्ये घोळ चौदावा वित्त आयोगाच्या निधीत झालेल्या कामातील गैर प्रकारास खतपाणी घातले रोजगार हमी योजना अंतर्गत संरक्षण भिंत बोरगाव कोल्हाडी येथील गैर प्रकारच्या पांघरूण घातले शेलवड ग्राम पंचायतीच्या 15 वा वित्त आयोग. दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर कामे कामावर काम दाखवून काही कागदपत्रे करने दलित वस्ती सुधार योजनेच्या निकुष्ठ दर्जाचे झालेल्या कामाची चौकशी न करणे इत्यादी प्रकारच्या तक्रारी आहेत आमदार धाडसी निर्णय जनतेत स्वागत करत आहेत.







