धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – गुरुवार दि.३डिसेंबर रोजी दिव्यांग सल्ला व मार्गदर्शन कक्षात जागतिक अपंग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळेस अशोक बिर्हाडे (गट शिक्षण अधिकारी )यांच्या हस्ते डॉ.हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन केले व आलेल्या दिव्यांग लाभार्थी बांधवांना स्वावलंबन कार्ड(UDID) चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कक्ष परीक्षक किशोर पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव सर ,मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, तसेच विशेष शिक्षक आर एस पाटील अनंत जाधव, जयदीप पाटील (समावेशित शिक्षण तज्ञ) विशेष शिक्षक दीपक पाटील ,तुळशीराम सैंदाणे, अनिल पाटील, राहुल वाणी ,चुनीलाल बेलदार, मंदार चौधरी ( शालेय पोषण अधीक्षक) उपस्थित होते.







