नाशिक (विशेष प्रतिनिधी) – साफसफाई करीत असतांना चौथ्या मजल्याच्या टेरेसवरून पडल्याने 19 वर्षीय कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना गुरूवारी (दि.3) दुपारी विहीतगाव येथे घडली. जितेंद्र सिंह (19 रा.आवर्णा हौ.सोसा.तलाठी कार्यालया समोर विहीतगाव) असे मृत कामगाराचे नाव आहे.
जितेंद्र सिंह हा कामगार गुरूवारी (दि.3) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवर साफसफाई करीत असतांना ही घटना घडली. झाडूने झाडत असतांना अचानक पाय घसरल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत त्यास गंभीर दुखापत झाल्याने कुटूंबियांनी त्यास तात्काळ जयराम हॉस्पिटल येथे प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ मेडिकल कॉलेज येथे हलविले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्युची नोद करण्यात आली आहे. अधिक तपास हवालदार कोकाटे करीत आहेत.







