नाशिकला डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

nashik-accident

नाशिक (विशेष प्रतिनिधी) – पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव रस्त्यावर डंपरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत दुचाकीस्वार मनपाचा सेवक आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा नवीन नाशिक येथील आरोग्य विभागाचे सेवक अजय सुभाष सारसर (29), रा. तलाठी कार्यालय, वडाळा गाव हे नोकरीसाठी साडेआठ वाजेच्या सुमारास पाथर्डी गावाकडून पाथर्डी फाट्या कडे दुचाकीने (एमएच 15 डीएफ 7809) स्त्यावरून जात असताना पाथर्डी गावाकडे जाणार्‍या डंपरने (एमएच 15 एफव्ही 8001) हॉटेल साई किरणसमोर कट मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील अजय सारसर यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

 

याप्रकरणी डंपर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here