शहादा (तालुका प्रतिनिधी विजय निकम) – जिल्हाधिकारी, नंदुरबार, राजेन्द्र भारुड यांना महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील काही लोक व्यापारी असल्याचा बनाव करून शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन करून पपई केळी कापुस खरेदी करून पैसे चुकते न करताच पसार होण्याच्या घटना वेळोवेळी दिसून येत असल्याने, जिल्हाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे लायसन्स अथवा काही संलग्नित महत्त्वाचे डॉक्यूमेंट्स किंवा व्यापाऱ्यांच्या परिचयाची नोंद आपल्या कार्यालयात करून आपल्या मार्गदर्शनलाखाली समिती स्थापन करुन व्यापाऱ्यांवर वचक बसावा जेणेकरून शेतकऱ्यांचे मेहनतीच्या पैशांची लूट होणार नाही असे निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेते श्री कांतीलालजी टाटिया, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष श्री ईश्वर माळी, प्रगतशील शेतकरी सुदाम पाटील, राजेंद्र माळी, चतुर पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.







