राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी

onion-farmer

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि.कुबेर जाधव) – राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्हा पदाधिकारी वर्गाने धुळे मतदार संघाचे खासदार सुभाष बाबा भामरे यांची भेट घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी तात्काळ हटवण्याची मागणी केली.

 

 

गेल्या 8 दिवसापासून कांदा बाजार भाव गडगडले ,शेतकरी वर्गाने गेल्या 6 महिन्यापासून साठवलेला कांदा खराब तर होतच होता आणि परत शासनाच्या कांदा निर्यात बंदी मागच्या महिन्यात करून कांदा भाव कमी केला आता नवीन पोळ कांदा मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागला आहे,देशात मागणी कमी आहे अश्या परिस्तिथी जर कांदा निर्यात बंदी हटवून कांदा निर्यात सुरू केली नाही तर शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात सापडेल,कांदा पिकवत असतांना शेतकऱ्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे,कांदा उत्पादन आता खर्चिक झाले आहे,बियाणे ,रासायनिक खते,मजुरीचे दर ,शेती तयार करायला लागणारे इंधनाचे दर शेतकऱ्यांना परवडेनासे झाले आहे तरी तो मोठ्या मेहनतीने ,हिमतीने कांदा पिकवतो आणि त्याला अश्या केंद्राच्या निर्यातीबाबत धरसोड धोरणाचा तो बळी ठरत आहे , असे असताना शासनाने कांद्याला जास्तीत जास्त भाव देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा प्रकारची आग्रही मागणी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या पदाधिकारीनीं खासदार सुभाष बाबा भामरे याच्याकडे केली.

 

 

धुळे मतदार संघाचे खासदार श्री सुभाषबाबा भामरे यांनी सदर शेतकरी वर्गाची मागणी योग्य आहे व सोमवारी दिल्लीला जाऊन पीयूष गोयल व इतर मंत्री वर्गाची भेट घेऊन ताबडतोब निर्यात खुली करण्याची मागणी करणार आहे असे आश्वासन शेतकरी वर्गाला दिले.

 

यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे व्यंगचित्रकार (कांदा योद्धे) किरण मोरे , अभिमन पगार,जिल्हा उपआद्यक्ष ,राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना , दिगंमबर धोंडगे, सटाणा तालुका कार्य आद्यक्ष, पंकज बोरसे ,सामाजिक कार्यकर्ते, हर्षल अहिरे,तालुका युवा अध्यक्ष, राजेंद्र सोनवणे,मिलिंदकुमार जाधव,संदीप बागुल,इ कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांते उपस्थित होते

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here