अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 7 नवे रुग्ण

अलिबाग-सोगावकर : अलिबाग तालुक्यात आज (8 जुलै) कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गोकुळेश्‍वर नगर, अलिबाग शहर, शहाबाज, नवगांव, पळी याठिकाणी नवीन 7 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या अडीचशेच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
अलिबाग तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग शहरातील जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या अकॉन्स क्लासिक सोसायटीत कोरोना रुग्ण आढळून आला आहे. येथील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर गोंधळपाडा-गोकुळेश्‍वर नगर येथील एका 21 वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शहाबाजमध्ये आज दोन रुग्ण आढळले आहेत. येथील 60 वर्षीय आणि 33 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. पाटीलवाडी नवगांव येथील 28 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. तर पळीमध्येही आज रुग्णांची नोंद झाली असून, 32 वर्षीय तरुण आणि 59 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
तसेच पेझारी, साखर-आक्षी, पोयनाड येथील 3 रुग्ण आज कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान आजच्या 7 नवीन रुग्णांमुळे तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 249 वर पोहोचली आहे. यापैकी 107 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 134 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.आजच्या नवीन रुग्णात 4 तरुण वर्गातील रुग्ण आढळले आहेत, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here