जळगाव (प्रतिनिधी) – काल जळगावातील एकमान्यवरांची प्रतिक्रिया पहाटे मॉर्निंग वॉकपासून सायंकाळच्या इव्हिर्निंग वॉक पर्यंत
अगोदर बघा नंतरच बिग थँक्यु द्या. याला समस्त जळगावकरांनी आपल्या कृतीतून शतप्रतिशत लॉकडाऊन पाळून जोरदार उत्तर दिले आणि टिका करणे सोपे आहे, चांगले वागणे कठीण आहे.
स्टेशन रोड, जिल्हा परिषद, बळीराम पेठ, टॉवर, दाणा बाजार, राजकमल टॉकीज, चित्रा चौक, जिल्हा पेठ, रिंगरोड, कॉलनी एरियातील एलआयसी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, प्रेम नगर, शिव कॉलनी, जुनी पाईप फॅक्टरी, प्रभात कॉलनी, रामानंद नगर, महाबळ कॉलनी, मोहाडी रोड, इच्छादेवी परिसर, अजिंठा चौफुली, आयोध्या नगर, सुप्रीम कॉलनी, विठ्ठल पेठ, जुन्या जळगावचा भाग, कांचन नगर या भागातील सर्वच नागरिकांनी उत्स्फूर्त लॉकडाऊन पाडलेला होता. या माहिती सोबतीतील फोटो बोलकी आहेत. टिका करणार्यां ची बोलती बंद करणारी आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महानगरपालिका या कामी उत्तम समन्वय दिसला. स्वत: पोलीस अधिक्षक व जेष्ठ पोलीस अधिकारी हेही रस्त्यांवर उतरलेले दिसले. काल आणि आज स्वत: जिल्हाधिकारी सुध्दा उतरले होते. 
अर्थात तुरळक प्रमाणात शिरसोली, मोहाडीकडून येणारी लोक आडमार्गाने शहरात येतांना दिसत होती, हे अनावश्यक दिसत असतांना पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. जळगाव शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग निमनुष्य होते. हायवे वरील वाहतूक अतिशय किरकोळ होती. भिक्षाकरीना भिक्षा मिळत नसल्याने आज ते कासावीस होते. येथे पुढील पाच दिवस सामाजिक संघटनांनी जबाबदारी स्विकारणे महत्त्वाचे वाटते. आज गणेश महामंडळ, शिवसैनिक, युवा शक्तीचे कार्यकर्ते त्याच बरोबर लोक संघर्षचे कार्यकर्ते व इतर मंडळी शहरातील अडीअचणीत असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडवितांना दिसत होती.
पोलिसांचे नियोजन अतिशय उत्तम होते. आज आरटीओ विभागाचे अधिकारी सुध्दा रस्त्यावर जबाबदारीने फिरतांना दिसत होते. शहराचे हे शांततेचे स्वरूप 1970 नंतर प्रथम जळगावकर अनुभव होते. या भयावह स्वरूपामुळे कोरोनाशी लढतांना मास्क किंवा रूमालाचा वापर करणे, सोशल डिस्टसिंगचे वापर करणे, वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाइज करणे, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडणे. हे जणू काही जळगावकरांनी अंगीकृत करून घेतलेले दिसते. संयमाने यापुढील लॉकडाऊनला सामोरे जावून कोरोनाची कडी तोडण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील राहू या!‘, असे आवाहन मल्टी मीडिया फिचर्स प्रा लि, जळगावचे सीईओ सुशील शामसुंदर नवाल यांनी केले आहे.







