जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या पाच हजार

जळगाव – जिल्ह्यात आज (दि.८) स्वॅब तपासणीचे मिळालेल्या अहवालात २०७ रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५ हजार १० झाली आहे. आज आढळलेल्या रुग्णात सर्वाधिक ३९ रुग्ण अमळनेर येथे आढळून आले आहे. दिवसभरात ८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या २०७ रुग्णांमध्ये जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण ७, भुसावळ ८, अमळनेर ३९, चोपडा १८, पाचोरा १०, भडगाव १, धरणगाव २३, यावल ३, एरंडोल १८, जामनेर १, रावेर ३०, पारोळा १, चाळीसगाव ३, मुक्ताईनगर १६, बोदवड १६ व अन्य जिल्ह्यातील १ रुग्ण असा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here