कोनगाव पोलीस ठाण्याचे पोलीसांनी २ किलो ३०० ग्रॅम गांजा घेवुन जाणाऱ्या दोन इसमांना केली अटक

thane-crime

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – दिनांक ०५/१२/२०२० रोजी कोनगाव पोलीस ठाण्याचे तपास पथकाचे सहा. पोलीस उप निरीक्षक व्ही.एफ. सुर्यवंशी यांना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीवरुन सहा. पोलीस आयक्त श्री प्रशांत ढोले, यांचे लेखी परवानगीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गणतपराव पिंगळे यांचे सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र पवार, तपास तथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील व पोलीस अंमलदार यांनी भिवंडी-कल्याण रोड, राजणोली नाका बसस्टॉप जवळ सापळा लावुन दोन इसमांना अॅटो रिक्षा क्रमांक MH04-JQ-7060 हिचेमधुन २ किलो ३०० ग्रॅम गांजा घेवुन जाणारे इसम नामे १) रफिक बशीर अन्सारी, वय ४२ वर्षे, रा. हरिबा कंम्पाउन्ड, साबिया पाडा, दहिसर मोरी, शिळफाटा, जि. ठाणे २) जमालुद्दीन मैनुद्दीन शेख, वय ३६ वर्षे, रा. सोनाजी नगर, मरियम मंजील, डी विंग, रुम नंबर १०३, अमृतनगर जवळ, मुंब्रा, जि. ठाणे यांना शिताफीने पकडुन त्यांचेवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ॥ २७८/२०२० एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम ८(क), २०(ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नमुद आरोपीतांचे ताब्यातुन ४६,०००/- रुपये किंमतीचा गांजा नावाचा अंमलीपदार्थ व १,२५,०००/- रुपये किंमतीची बजाज कंपनीची अॅटो रिक्षा तसेच १०००/- रुपये किंमतीचा मोबाईल फोन अस एकुण १,७२,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेतला आहे.

 

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री. अनिल कुंभारे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, भिवंडी श्री. योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त, श्री. प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. गणपतराव पिंगळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राजेंद्र पवार, सहा. पोलीस निरीक्षक, अभिजीत पाटील, सहा.पोलीस उप निरीक्षक, व्ही.एफ.सुर्यवंशी, पोहवा/२४२० उदमले. पो.हवा/३६७७ मोरे, पो.ना/ ४६६१ किरण पाटील, पो.शि/७२०३ गणेश चोरगे, पो.शि/७२२१ कृष्णा महाले व पो.शि/७०५६ नरेंद्र पाटील यांनी केलेली असुन वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री राजेंद्र पवार हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here