अनिल गलगली यांच्या प्रयत्नाने 41.65 कोटी मंजूर

anil-galgali

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – गेल्या 13 वर्षांपासून चांदीवली येथील संघर्ष नगरातील हजारों सदनिकाधारक मूलभूत सुविधांसाठी सरकार कडे संघर्ष करत होते. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या प्रयत्नातून महापालिकेने रस्ते व इतर सुविधांसाठी नुकतेच  41.65 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

 

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उप प्रमुख अभियंता ( रस्ते ) पूर्व उपनगरे यांनी अनिल गलगली यांस कळविले की दिनांक 18 नोव्हेंबर 2020 रोजी कार्यादेश जारी केले आहेत. निवाराचे संयोजक गुरबीर सिंह यांनी अनिल गलगली यांस विनंती केल्यानंतर गलगली यांनी तत्काळ रस्ते विभागाच्या अधिकारी वर्गाशी संपर्क केला. उप आयुक्त संजय दराडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. एकूण 42 कोटींचे काम मंजूर झाले असून यात सीसी पॅसेज, सीसी रोड, जल वाहिनी, पर्जन्य जलवाहिनी तसेच एसपीचे काम होणार असून 18 महिन्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.

 

अनिल गलगली यांच्या मते सुमेर बिल्डर आणि एसआरए तर्फे ही कामे केली जाण्याची अपेक्षा होती पण दुर्दैवाने दुर्लक्ष करण्यात आले असून ही रक्कम महापालिका प्रशासनास अदा करण्यात यावी. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 1 मे 2007 रोजी सर्वप्रथम 15 लोकांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या होत्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत नागरिकांचे पुर्नवसन चांदीवली येथील संघर्ष नगरात करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here