मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – काॅज फाऊंडेशन आणि कै.वामनराव ओक रक्तपेढी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 6 डिसेंबर, 2020 रोजी, रक्तदान शिबीर कळवा ठाणे येथे संपन्न झाले. ह्या रक्तदान शिबिरात 26 रक्तदात्यांनी यशस्वीपणे सहभाग घेतला.
कॉज फाऊंडेशनच्या संस्थापिका श्रीमती. कल्पना मोरे, जितेश मोरे, .मंदार शेवडे आणि त्यांच्या सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कै.वामनराव ओक रक्तपेढीतील कर्मचार्यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच प्रकल्प समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध केळकर, कार्यवाह श्रीमती. कविता वालावलकर, कोशाध्यक्ष, मुकुंद बेलसरे आणि सहकार्यवाह, अजय पाठक ह्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी सध्या कोरोना संकटात जाणविणारा रक्ताचा तुटवडा भरुन काढणे व त्यासाठी ऐक्छिक रक्तदानासाठी एक नागरिक म्हणून पुढे येणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे मत कै.वामनराव ओक रक्तपेढीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अमेय महाजन यांनी व्यक्त केले.








