सांगली (जिल्हा प्रतिनिधी राजू पाटील) – मिरज शहरातील एका 35 वर्षीय तरुणाच्या डोक्यात दगड घालून आणि गळा चिरून खून करण्यात आला आहे. गोविंदा मुत्ती अस मृत तरुणाच नाव असून खून करून हल्लेखोर पसार झाले आहेत. मिरजेतील समता नगर या परिसरातील ही घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मृत तरुण हा त्याचा आई सोबत या परिसरात वास्तव्यास आहे. रात्री अंधाराचा फायदा घेत मध्यरात्री हल्लेखोरांनी निर्घृणपणे गोविंदा याचा खून केला. धारदार हत्याराने त्याचा गळा चिरून डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला आहे. खुनाच कारण मात्र समजू शकले नाही.







