शिरपूर येथे युवासेनेतर्फे महारक्तदान शिबीर संपन्न; 42 रक्तदात्यांनी केले रक्तदान

blood-donation-shirpur

महारक्तदान शिबीराचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते उद्घाटन

शिरपूर (प्रतिनिधी) – राज्यात कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा दूर करण्यासाठी ”माझे कुटूंब माझी जबाबदारी” अभियानाअंतर्गत तालुका शिवसेना-युवासेनेतर्फे शिवसेना कार्यालय येथे महारक्तदान शिबीर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केले. यात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यासह भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.shirpur-blood-donation

 

 

संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 ची परिस्थिती आटोक्यात येत आहे. या कठीण परिस्थितीत राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी ”माझे कुटूंब माझी जबाबदारी” अंतर्गत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेनाप्रमुख आदित्य साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेतर्फे रविवारी शिरपूर विधानसभा मतदार संघात शिवसेना कार्यालय पोस्ट ऑफिस समोर, शिरपूर येथे सकाळी 10.00 ते संध्याकाळी 5.00 या वेळेत महारक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबीराचे उद्घाटन शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांच्या हस्ते संपन्न झाले. या महारक्तदान शिबीरात 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

 

याप्रसंगी शिवसेनेचे धुळे ग्रामीणचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके, युवासेना जिल्हाप्रमुख पंकज गोरे, उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत, उपजिल्हा संघटक भाईदास पाटील, तालुका प्रमुख दिपक चोरमले, तालुका प्रमुख अत्तरसिंग पावरा, तालुका संघटक योगेश सूर्यवंशी, शहर प्रमुख मनोज धनगर, उपतालुका प्रमुख मंगलसिंग भोई, शहरसंघटक प्रेम चौधरी, उपशहर प्रमुख बंटी लांडगे, योगेश ठाकरे, देवाजी पाटील, दिनेश गुरव, जितेंद्र पाटील, अशोक मिस्त्री, पिंटू शिंदे, दिपक धनगर, अविनाश ठेलारी, विजय जोगराणा, गोरख कोळी, सागर कोळी, भूषण गोसावी, पुणेश बोरसे, सुकदेव बागुल, महिला आघाडीच्या वीणाताई वैद्य, अर्चना देसले, भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्याल धुळे डॉ.शलाका तुपकरी, निलेश सुराने, अविनाश सूर्यवंशी, संजय चौधरी डॉ.टीम तसेच शिवसैनिक उपस्थित होते. महारक्तदान शिबीराचे आयोजन युवासेनेचे रोशन सोनवणे, अनिकेत बोरसे, विजय पावरा, निखिल मराठे यांनी केले होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here