पालघर (प्रमोद मिश्रा) – येथील वालीव पोलीस ठाणे हद्दीतील भंगारगल्ली नंबर ०१ मौजेगांगडीपाडा वसई पुर्व ता. वसई जि. पालघर येथे आरोपीत नामे १) रजुधीन रा. सोपारागाव नालासोपारा पश्चिम २) अफजल मेमन रा. सोपारागाव नालासोपारा पश्चिम याने त्यांचे कब्जात येथे स्वत:च्या मालकीच्या भंगाराच्या दुकानात महाराष्ट्र शासनाने तंबाखुजन्य अन्नपदार्थांसंबधांत जारी केलेल्या प्रतिबंधीत आदेशाची अवज्ञा करुन आपले कब्जात माल बाळगले असतांना मिळुन आले. आरोपीत यांचे ताब्यातुन १) ३,५०,०६४/- रुपये किंमतीचे एकुण ०९ गोणपाटच्या गोणी त्यात प्रत्येकी ४ पांढ-या रंगाच्या नायलॉन गोणी असे एकुण ३६ नायलॉनच्या गोणीत पैकी प्रत्येक नायलॉनच्या गोणीत केसरयुक्त विमल पान मसाला असे लिहीलेले ५२ पाकीटे २) ३,०४,९२०/- रुपये किंमतीचे एकुण ०७ गोणपाटच्या गोणी त्यात प्रत्येकी १० पांढ-या रंगाच्या नायलॉन गोणी असे एकुण ७० नायलॉनच्या गोणीत पैकी प्रत्येक नायलॉनच्या गोणीत केसरयुक्त विमल पान मसाला असे लिहीलेले २२ पाकीटे ३) ३३,८८० /रुपये किंमतीचे एकुण ०७ नायलॉनच्या आकाशी रंगाच्या मोठया गोणी त्यात प्रत्येक नायलॉनच्या मोठया गोणीत १० गोणी असे एकुण ७० नायलॉनच्या गोणी ४) ५४,९१२ /- रुपये किंमतीचे एकुण ०८ नायलॉनच्या गोणी, ३२ नायलॉनच्या गोणी पैकी प्रत्येक नायलॉनच्या लहान गोणीत वि-०१ तंबाख्नु असे लिहीलेले ५२ पाकीटे ५)१७,४२४ /- रुपये किंमतीचे एकुण ०४ नायलॉनच्या पांढ-या रंगाच्या लहान गोण्यात्यात २२ पाकीटे ६)२४,९६०/- रुपये किंमतीचे एकुण ०४ गोण्यात्यात ५२ पाकीटे असा एकुण ७,८६,१६०/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीत याचे विरुद्ध वालीव पोलीस ठाणे गु.र.नं. । ६२८/२०२० भा.द.वि.स.क.३२८, २६९, २७०, २७३, १८८, २६, ४, ३० (२) (ए)५१(बी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले असुन पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. विलास चौगुले प्रभारी अधिकारी वालीव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वालीव पोलीस ठाणेचे अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.







