कमी वेळात जास्त पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक

पालघर (प्रमोद मिश्रा) – कांदिवली येथील एका व्यापाऱ्याला दि. २५ सप्टेंबर २०१८ ते २२ ऑक्टोबर २०१८ दरम्यान कमी वेळात जास्त पैसे मिळवून देतो असे आमिष दाखवून त्यांच्याकडून एकूण ३८ लाख रुपये शेअर्स मार्केटमध्ये गुंतवण्यास लावले. मात्र गुंतवलेले पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक केली म्हणून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवसायातील नफ्याचे आमिष दाखवून फसवणूक
प्लास्टिक ग्लास बनविण्याची मशिन घेण्यासाठी बँकेकडून कर्ज घेऊन पैसे दिल्यानंतरही श्री साई इंटरप्राजेस कंपनीने मशिन वा पैसे काहीही परत न करता सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केली म्हणून बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून, भा.दं.वि.४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here