पुणे (पंढरी गायकवाड) – अनेक दिवसांपासून रखडलेली वाघोली वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाला सुरवात पी एम आर डी ए
यांनी 22 कोटी रुपये निधी मंजूर करून सात ते आठ महिन्यापूर्वी वाघोली मधील वाढीव पाणीपुरवठा योजना वर्क ऑर्डर देऊन सुद्धा सदर योजनेचे कामाला सुरुवात झाली नव्हती यासाठी 17/06/2020 रोजी वाघोली ग्रामपंचायत सदस्य व वाघोली मधील नागरिक यांच्या उपस्थिती मध्ये PMRDA ऑफिस औंध या ठिकाणी आंदोलन केले होते.
त्यानंतर 24/06/2020 रोजी शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांच्या नेतृ्त्वाखाली पुणे शिवसेना जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके यांच्या समवेत वाघोली ग्रामस्थ व सदस्य यांची पी एम आर डी ए आयुक्त श्री विक्रम कुमार साहेब व झेड पी सी ई ओ आयुष प्रसाद साहेब यांच्याशी वाघोली आव्हळवाडी रखडलेली नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना यासंधर्भात अडचणी वर चर्चा करण्यात आली होती आयुक्तांना योजनेचे काम त्वरित काम चालू करावे अशा सूचना देण्यात आल्या या नंतर आयुक्तांनी दहा दिवसांमध्ये काम चालू होईल व मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करणार असं आश्वासन देण्यात आलं होतं.
त्यानुसार अनेक दिवसांपासून रखडलेली वाघोली येथील वाढीव पाणी पुरवठा योजने च्या कामाला आज सुरुवात करण्यात आले.5 एम एल डी पाणी दिवसाला वाघोली साठी उपलब्ध होणार आहे
आज चालू झालेल्या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके मा उपसरपंच रामकृष्ण सातव मा उपसरपंच संदीप सातव,सुनील चाचा जाधवराव,सागर गोरे,गणेश गोगावले, अनिल सातव पाटील ,मच्छिंद्र सातव पाटील ग्रामस्थ उपस्थित होते
Home Uncategorized वाघोलीमधील नागरिकांच्या आंदोलनाला यश; रखडलेल्या वाघोली वाढीव पाणीपुरवठा योजनेस सुरुवात







