राजगृह हल्लाप्रकरणी इस्लामपूर येथे आंदोलन

पुणे (प्रतिनिधी) – बहुजन परिवर्तन पार्टी प्र. महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्यावतीने सांगली जिल्हा उपाध्यक्ष अविष्कार जयसिंग बल्लाळ यांनी तहसील कार्यालयात जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञात लोकांकडून तोडफोड झाल्याप्रकरणी आरोपींवर त्वरित कारवाई होण्याचे निवेदन दिले.
निवेदन दिल्यानंतर कार्यालयाबाहेर आल्यावर घोषणाही दिल्या. सरकारने प्रशासन कडक करुन आरोपीला अटक झाली पाहिजे, अटक न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करु. कोरोनाचे संकट असल्याने आम्ही फक्त निवेदन दिले आहे. मात्र कारवाई न झाल्यास आम्ही या परिस्थितीतही आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तरी शासनाने याबाबत त्वरित निर्णय घेऊन आरोपींना शोधून त्याना अटक करून तात्काळ कठोरात कठोर शासन करावे, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here