जिल्हाधिकारी साहेब गरीब पेशंटने जावे कुठे? – फारुख शेख

जळगाव (प्रतिनिधी) – शहर व परिसरात आपल्या आदेशाने लॉकडाऊन सुरु आहे. पण एखादा गरीब पेशंट जर गोदावरी, गणपती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ॲडमिट व्हायला गेल्यास, तिथे बेड उपलब्ध नाही असे उत्तर मिळत आहे. या गरीब पेशंटला बेड उपलब्ध न झाल्यास त्या पेशंट नी कुठे जावे ? याबाबत आपण जाहीरपणे मार्गदर्शनपर सूचना प्रसिद्धी करावी, जेणेकरुन गरीब पेशंटांची ससेहोलपट थांबेल, असा सवाल निवेदनाद्वारे जळगाव कोविड केअर युनिट जळगाव जनसंपर्क प्रमुख फारुक शेख अब्दुल्ला यांनी जिल्हाधिकारी यांना विचारला आहे.
याबाबत निवेदनात पुढे म्हटले आहे की, दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी साडे पाच ते साडे सहा च्या वेळेत मला दोन रुग्ण नावे जगदीश समाधान पवार राहणार भुसावळ व श्रीमती बोरसे रा बामनोद ता यावल यांचे फोन आले की आम्हास कोविड हॉस्पिटल जलगाव येथे ॲडमिट करत नाही कारण की बेड खाली नाही. मी सांगितले की आपण थोडावेळ वाट पहा.
श्री पवार यांनी मला पुन्हा संपर्क साधला असता व सांगितले की मला श्वास घेण्यास फार त्रास होत आहे म्हणून मी ड्युटीवर असलेले डॉक्टर वैद्य यांच्याशी श्री पवार यांच्याच मोबाईल वरून बोललो व त्यांना विनंती केली की हा रुग्ण भुसावळ येथील रेफर लेटर घेऊन गोदावरी हॉस्पिटलला गेला त्याठिकाणी त्याला सांगण्यात आले की तुला निमोनिया आहे, कोरोना नाही तू घरी जा म्हणून तो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे आला आहे त्यास श्वास घेण्यास त्रास होत आहे. कृपया त्याला बघा व धीर द्या.
मी पुन्हा डॉक्टर वैद्य यांना विनंती केली असता त्यांनी कबूल केले की रुग्णाचा सॅच्युरेशन 56 आहे मी माझ्या वरिष्ठांशी बोलतो व त्याला कुठेतरी ॲडमिट करतो कारण त्याला ॲडमिट करणे आवश्यक आहे परंतु माझ्याकडे बेड शिल्लक नसल्याने मी आत्ताच काही मदत करू शकत नाही. तेव्हा मी थोडं त्यांच्यावर प्रेशराइज्ड विनंती केली तेव्हा त्यांनी सांगितले की मी आताच वरिष्ठांना विचारून ॲडमिट करतो.
पेशंटला प्रथम दहा नंबर वार्ड मध्ये ॲडमिट केले व नंतर सदरचा पेशंट सात नंबर मध्ये ॲडमिट आहे. श्रीमती बोरसे ह्या तर बेड शिल्लक नाही हे उत्तर ऐकून निघून गेल्या त्यांचा पत्ता किंवा लोकेशन पुन्हा लागला नाही. सर आपण सर्वजण म्हणजे जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक , तसेच कोविड हॉस्पिटलचे डॉ मारोती पोटे,डॉ विजय गायकवाड संपूर्ण टीम फार चांगले कार्य करीत आहे परंतु जर गोदावरी हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणून सुद्धा कार्यरत आहे त्यांनी जर श्री जगदीश पवार यांना तुला निमोनिया आहे कोरोना नाही तू घरी जा असे बोलणे कितपत योग्य आहे ?
सदर रुग्ण हा भुसावळला खडका चौफुलीवर राहतो व मजुरी करतो ज्यांच्या शेजारी राहतो ते माझे पुतणे असून सेंटर रेल्वे ला नोकरी करतात म्हणून त्यांनी मला या पेशंट विषयी सांगितले म्हणून त्याचं संपूर्ण फॉलोअप मी घेत असल्याने सदर बाब आपल्या निदर्शनास आणीत आहे. यात तक्रार हा मुद्दा नसून गोदावरी हॉस्पिटलचा डॉक्टर अथवा कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा आपल्या निदर्शनास आणला आहे. तसेच जर गोदावरी, गणपती व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेड उपलब्ध न झाल्यास त्या पेशंट नी कुठे जावे ? याबाबत आपण जाहीरपणे मार्गदर्शन पर सूचना प्रसिद्धीस द्यावी, अशी विनंतीही या निवेदनात शेवटी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here