अलिबाग-सोगावकर – अलिबाग तालुक्यातील रामधरणेश्वर डोंगरावर ७/१२/२०२० रोजी दुपारच्या वेळी अज्ञात व्यक्तीने आग लावली होती, रामधरणेश्वर डोंगरावर भरपूर प्रमाणात वनसंपत्ती आहे, याठिकाणी अलिबाग तालुक्यातील आसपासच्या परिसरातील मोठ्या प्रमाणात मुकी जनावरे दिवस रात्र चरत असतात, तसेच डोंगरावर काही आदिवासींची घरे सुद्धा आहेत, ह्या आगीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा व वनसंपत्तीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे, सुदैवाने आदिवासींची घरे जळण्यापासून वाचवण्यात वन कर्मचारी, व पर्यावरण प्रेमी मित्र यांना यश आले आहे.

वणवा लागल्याची माहिती पत्रकार सोगावकर यांना उशिरा मिळाली, त्यांनी वेळ वाया न घालवता सदर वणव्याची माहिती व गंभीर बाब म्हणजे त्याठिकाणी असणारी आदिवासींची घरे वाचविण्यासाठी लवकर कार्यवाहीसाठी वनाधिकारी श्री सुहास म्हात्रे यांना दिली,वनाधिकारी यांनी त्वरित कार्यवाही करत आपले वनकर्मचारी यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले, त्यांना मदत करण्यासाठी पर्यावरण प्रेमी श्री मंगेश राऊत, सचिन घाडी पुढाकार घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शेवटपर्यंत सहकार्य केले.
आगीची भयानकता एव्हढी होती की आग आटोक्यात आणण्यासाठी रात्री ९:३0 वाजता सुरुवात केली ती मध्यरात्री उशिरा साधारण २ वाजेपर्यंत आग विझवण्याचे अथक प्रयत्न केले व त्यात त्यांना यश आले. या आगीमुळे वनांचे व वनातील जंगली प्राण्यांचे व राष्ट्रीय संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे, याबद्दल पर्यावरण प्रेमी मित्र यांनी हळहळ व्यक्त केली आहे, आग लावणाऱ्या समाजकंटक व्यक्तीचा शोध घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी वनाधिकारी यांच्याकडे केली आहे, वनाधिकारी यांनी कारवाई करण्याची व अशा समाजकंटकांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे तसेच शोध काढून दंडात्मक कारवाईचे आश्वासन दिले आहे.
सदरील आग आटोक्यात आणण्यासाठी वनाधिकारी श्री सुहास म्हात्रे, वनरक्षक-सचिन ठाकूर, प्रदीप पाटील,मंगेश धोंगडे, वनमजुर-नागेश काष्टे,पर्यावरण प्रेमी व पत्रकार श्री मंगेश राऊत,सचिन घाडी, पत्रकार व रायगड चा युवक चे आपत्ती व सुरक्षा मित्र श्री. अब्दुल सोगावकर यांनी यशस्वी प्रयत्न केले.







