भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – कुऱ्हे पानाचे तालुका भुसावल येथील दीपक रवींद्र शिंदे यांची नुकतेच मराठा बटालियन पुणे ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी निवड झाली असून त्याला निरोप देण्यासाठी गावातील अनेक नागरिक मान्यवर उपस्थित होते.
दिपक हा सामाजिक कार्यकर्ते संजय रामदास शिंदे यांचे पुतणे तर रवींद्र रामदास शिंदे यांचा छोटा मुलगा आहे. याप्रसंगी गावातील पोलीस पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य अण्णा भाऊ शिंदे, डॉ रमाकांत पाटील ,नाना भाऊ पाटील,श्रीकांत बरकले ,शरद भाऊ शिंदे ,रमेश भाऊ शिंदे, सुभाष भाऊ शिंदे, निवृत्ती शिंदे, शिवाजी शिंदे, संपूर्ण शिंदे परीवार व गावातील सर्व ग्रामस्थ शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.








