पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांना पाठींबा व केंद्रसरकरने शेतकरी निर्णयास विरोध करणारे पत्र तहसीलदारांना देवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर व शहर युवक काँग्रेसचे कार्यकत्यांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती मोनिकताई हरगुडे जिल्हा परिषदेच्या सदस्या कुसुमताई मांढरे ,रंजनभैय्या झांबरे अध्यक्ष. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी, सागर नरवडे ,हाफिज भाई बागवान,राहील शेख,कालीम सय्यद ,सागर पांढरकामे,अमोल चव्हाण ,रफिक शेख, निलेश पवार आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. शिरूर शहर परिसरात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधत सर्व दुकाने बंद ठेवून बळीराजा करीत असलेल्या आंदोलनास साथ दिली आहे.







