राज्यपाल यांच्याहस्ते भारतीय व्हीलचेयर क्रिकेट संघाचे कर्णधार रमेश सरतापे यांचा कोरोना योध्दा म्हणून गौरव

ramesh-sartape

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – राजभवन मध्ये भारतीय विकास संस्थान आयोजित कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळा महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला.

 

त्यामध्ये १८ व्यक्तींना “कोरोना योध्दा” पुरस्कार देण्यात आला. रमेश सरतापे (कर्णधार भारतीय व्हीलचेयर क्रिकेट संघ) यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना योद्धा प्रमाणपत्र आणि तुलस देवून सन्मानित करण्यात आले. रमेश सरतापे यांनी कोरोना महामारीच्या काळात ६५० दिव्यांग बांधवांना रेशन कीट वाटप केले. त्यानी आपल्या तीन चाकी गाड़ी वर कुरीअरचे काम पण केले आहे.

 

या  कार्यक्रमास गोपाल शेट्टी (खासदार ), योगेश दुबे (अध्यक्ष-भारतीय विकास संस्थान) आदी  मान्यवर उपस्थित होते. कोरोना योध्दा म्हणून गौरव झालेल्या रमेश सरतापे यांच्यासह सर्व मान्यवर पुरस्कार विजेत्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here