जलकुंभावर चढून आंदोलन करणाऱ्या ‘त्या’ नगरसेविकेवर गुन्हा

nashik-andolan

नाशिक (विशेष प्रतिनिधी कुबेर जाधव) – विनापरवानगी महापालिका विरोधात नवीन नाशिक येथे पाणी प्रश्नी आंदोलन केल्याप्रकरणी नगरसेविकेसह सात जणांविरूध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघटन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेविका किरण गामणे व त्यांचे पती योगेश उर्फ बाळा दराडे, पप्पू काकडे, सुनिल केदार, विकी सांगळे, अभिषेक सिंग आणि ऋषीकेश ताजणे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.सोमवारी (दि.7) दुपारच्या सुमारास पाथर्डी फाटा येथील जलकुंभ क्र.2 येथे हे आंदोलन करण्यात आले होते. सिडकोतील पाणी प्रश्नी नगरसेविका गामणे यांनी मनपा विरोधात हे आंदोलन केले होते.

याप्रकरणी पोलीस शिपाई निंबेकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात जमाव बंदी आदेशात पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्रीत येण्यास मनाई असतांना संबधीतांनी जमाव जमवित विनापरवानगी आंदोलन केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक कोल्हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here