जळगाव जिल्ह्यात आज 292 करोना बाधित रूग्ण आढळले

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधित रूग्ण संख्येत मोठी वाढ होत असून आज पुन्हा नवीन २९२ करोना बाधित रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील करोना बाधित रूग्णाची संख्या ५३०२ इतकी झाली आहे.
या २९२ कोरोना बाधितांमध्ये जळगाव शहर – ८२, जळगाव ग्रामीण – २०, भुसावळ – १८, अमळनेर – १२, पाचोरा – १, भडगाव – १, धरणगाव – ४, यावल – १४, एरंडोल १७, जामनेर ३३, रावेर – ८, पारोळा – १४, चाळीसगाव – १७, मुक्ताईनगर – ३१, बोदवड – १९, इतर जिल्ह्यातील १ असा समावेश आहे.
जळगाव, भुसावळ, अमळनेर येथे सात दिवसांचा कर्फ्यू असूनही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने आता जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here