पीआय दिलीप गांगुर्डे यांना कोरोना योध्दा पुरस्कार

धुळे (प्रतिनिधी) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर धुळे शहर व तालुक्यात होत असतांना, अनेक सेवाभावी संस्थांसह, लॉकडाऊनचे नियमपालनासाठी पोलिसांनी अहोरात्र सेवा दिली होती. पोलिसांच्या या निःस्वार्थ सेवेचा गौरव करण्याकरिता लोकहित पत्रकार संघातर्फे कोरोना योध्दा सन्मान पुरस्कार देण्यात येत आहे. येथील तालुका पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय दिलीप गांगुर्डे साहेब यांना लोकहित पत्रकार सन्मान कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी लोकहित पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विनोद पठाण यांच्यासोबत दाऊद मन्सुरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here