भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दिनांक ११ डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता भुसावळ तालुक्याचे कर्तव्यदक्ष, कर्तबगार,विकास पुरुष लाडके आमदार सन्माननीय संजयभाऊ सावकारे साहेब (माजी पालकमंत्री तथा राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्मार्ट विलेज ग्रामपंचायत साकेगाव मंगल कार्यालय सभागृह लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी समस्त ग्रामस्थ भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आग्रहाचे निमंत्रण आयोजन कमिटीतर्फे करण्यात येत आहे.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय खासदार रक्षाताई खडसे, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. आमदार संजयभाऊ सावकारे प्रमुख पाहुणे मा. आमदार तथा जिल्हाअध्यक्ष भारतीय जनता पार्टी राजूमामा भोळे पंचायत समिती सभापती मनीषाताई पाटील जिल्हा परिषद सदस्य पल्लवी ताई सावकारे उपसभापती वंदनाताई उन्हाळे पंचायत समिती सदस्य प्रीतीताई पाटील भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील माजी नगराध्यक्ष युवराजभाऊ लोणारी माजी नगरसेवक राजेंद्रभाऊ आवटे ,समाजसेवक प्रमोदभाऊ सावकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती संजय पाटील शकील पटेल माजी उपसरपंच साकेगाव, दिलीप सिंग पाटील चेअरमन इं. गांधी माध्यमिक विद्यालय साकेगाव सह सकेगाव ग्रामपंचायत कमिटी तथा समस्त भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगल कार्यालय सभागृह लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे
राज्यस्तरावर पायाभूत सुविधा पुरस्कारांमध्ये मंगल कार्यालयाच्या कमी मुळे द्वितीय क्रमांक ठरलेल्या स्मार्ट विलेज ग्रामपंचायत साकेगाव मध्ये आदरणीय खासदार रक्षाताई खडसे व आमदार संजय भाऊ सावकारे यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच त्यांनी दिलेल्या 40 लक्ष रुपये निधीच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेज साकेगाव ग्रामपंचायतीचे भव्य मंगल कार्यालय लोकार्पण होत असून या एतिहासिक उपक्रमाला समस्त ग्रामस्थ तसेच सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे अशी आग्रहाची विनंती कार्यक्रमानंतर भुसावळ तालुक्याचे आमदार संजय भाऊ सावकारे यांचा भव्य वाढदिवस सोहळा संपन्न होणार आहे तरी या सोहळ्याला सर्वांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन अनिल पाटील माजी सरपंच, आनंद ठाकरे माजी आदर्श सरपंच, सुरेश पाटील माजी सरपंच, सन्माननीय सदस्य माणिक पाटील, दिगंबर पाटील, संतोष भोळे ,भोळे गजानन कोळी ,अनिल सोनवाल, बळीराम सोनवणे सुभाष कोळी, समस्त भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते स्मार्ट विलेज साकेगाव यांनी केले आहे.







